देसाईगंज : तालुक्यातील कुरुड गावच्या नागरिकांनी होळीची परंपरा जपताना सामाजिक एकोप्याचेही भान ठेवले. येथील ग्रामस्थ गेली अनेक वर्षे ‘एक गाव एक होळी’ची परंपरा जपतात. गावातील मु्ख्य चौकात एकच होळी लावून गावकरी पुजन करतात. विशेष म्हणजे सध्या लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय मंडळी सक्रिय झालेली असताना होळीचा सण साजरा करण्यासाठी सर्वजण राजकीय झूल बाजुला करून एकत्र येत या उत्सवात सहभागी झाल्याचे पहायला मिळाले.
कुरूड येथील मंडई देसाईगंज तालुक्यात प्रसिद्ध आहे. एकाच दिवशी 8 ते 10 नाटकाचे प्रयोग सादर केले जातात. नाटककार, गायक, कवी, लेखक, विविध राजकीय क्षेत्रातील मंडळी, सामाजिक कार्यकर्ते या गावातून उदयास आले आहेत. हे गाव शंकरपटासाठीही प्रसिद्ध आहे. या गावात होळी सणाची परंपराही उत्साहाने जपली जात असल्याचे शिवसेनेचे (उबाठा) उपजिल्हा प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अविनाश गेडाम यांनी सांगितले.