कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा? लवकर ठरवा, अन्यथा संधी गमवाल

'गोंडवाना'ने वाढविली प्रवेश घेण्याची मुदत

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी दिलेली २२ आॅगस्टची मुदत वाढविण्यात आली आहे. आता ६ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहेत. कोणीही इच्छुक आणि पात्र विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे यांनी हा निर्णय घेतला आहे.

अनेक विद्यार्थी विहीत तारखेपर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकले नाहीत. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी सर्व प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना
६ सप्टेंबर २०२३ पर्यंत महाविद्यालयांत प्रवेश घेता येणार आहे. सदर मुदतवाढ ज्या अभ्यासक्रमाचे प्रवेश केन्द्रीय प्रवेश समितीव्दारे केले जातात त्यांना लागू राहणार नाही. निर्धारीत प्रवेश क्षमतेमध्ये रिक्त जागी प्रवेश देण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून कळविण्यात आले.