राजाराममध्ये रंगणार व्हॉलीबॉल स्पर्धा, तब्बल ४० संघांनी घेतला सहभाग

भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन

अहेरी : तालुक्यातील राजाराम (खां) येथे प्रथमच मोठ्या उत्साहाने व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी जि. प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. जवळपास ४० संघांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केल्यामुळे स्पर्धेची चुरस चांगलीच वाढणार आहे.

शिवराम स्टेडियमवर गोंडवाना गोटूल क्लबच्या वतीने या ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस ३० हजार, द्वितीय २० हजार, आणि तृतीय १० हजार, तथा आकर्षक शिल्ड देण्यात येणार आहे.

यावेळी भाग्यश्रीताईंनी उपस्थित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः मैदानात उतरून व्हॉलीबॉल मॅच खेळून आनंद लुटला व उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सहउद्घाटक म्हणून सरपंच मंगला आत्राम, अध्यक्ष म्हणून तिरुपती कुळमेथे, प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा.पं सदस्य विनायक आलम, सुशीला सोयाम, खांदलाचे उपसरपंच राकेश सिडाम, अनिता आलम, प्रफुल मारकवार, विजय अंबिलपवार, महेश कुसराम, सत्यवान आलाम, शारदा आत्राम, सीताराम पोरतेट, शारदा आलाम, दर्याबाई सडमेक, बबलू गावडे, वसंत सडमेक, आनंद वेलादी, जयराम आत्राम, व्यंकटेश अर्का आदी प्रामुख्याने उपस्थित होते.