बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना रिपब्लिक पक्षाच्या वतीने अभिवादन

इंदिरा गांधी चौकात केला जयघोष

गडचिरोली : रिपब्लिकन पक्षाचे सेनानी तथा राज्यसभेचे माजी उपाध्यक्ष दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मृती दिनानिमित्त बुधवारी (दि.9 एप्रिल) सकाळी 8 वाजता इंदिरा गांधी चौकात अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.

रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास निंबोरकर यांच्या हस्ते बॅरी.खोब्रागडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व मेणबत्ती प्रज्वलित करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, ज्येष्ठ आदिवासी कार्यकर्ते वसंत कुळसंगे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस प्रा.गौतम डांगे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश दुधे, सचिव प्रा.राजन बोरकर, मराठा सेवा संघाचे डॉ.सुरेश लडके, महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या सुरेखा बारसागडे, जिल्हाध्यक्ष नीता सहारे, शहर अध्यक्ष वनमाला झाडे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुखदेव वासनिक, प्रेमेंद्र सहारे, सिद्धार्थ रामटेके, लहूजी रामटेके यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.