
गडचिरोली : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दोन आठवडे भाजपा महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी सभा घेतल्यानंतर मतदानाच्या दिवशीही भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी सक्रिय होते. माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी गडचिरोली शहरासह धानोरा, कोरची, कुरखेडा, वडसा आणि आरमोरी या विविध तालुक्यांतील मतदान केंद्रांना भेटी देऊन बूथ व्यवस्थापन व मतदान नियोजनाची पाहणी करून आढावा घेतला.
या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध मतदान केंद्रांवर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदानाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीची पाहणी केली. तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांशी चर्चा करून निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला.
शहरातील मतदान केंद्रांना भेट
गडचिरोली शहरातील मतदान केंद्र क्रमांक 429, 430, 433 व 434, तसेच जवाहरलाल नेहरू शाळा आणि पंचायत समिती येथील मतदान केंद्रांना डॉ.अशोक नेते यांनी भेट दिली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, शहराध्यक्ष तथा नगरपरिषद सभापती अनिल कुनघाडकर, भाजपा तालुकाध्यक्ष दत्तू सूत्रपवार, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, हर्षल गेडाम, विनोद देवोजवार, घनश्याम वाढई, नरेश हजारे, दिनेश नवघडे यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.
धानोरा येथे मतदान नियोजनाची पाहणी
धानोरा येथील तहसील कार्यालयातील मतदान केंद्र क्रमांक 435 येथे भेट देऊन त्यांनी नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी गडचिरोलीचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे, धानोरा भाजपा तालुकाध्यक्ष साजन गुंडावार, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, जिल्हा सचिव सारंग साळवे, जिल्हा सचिव लता पुनघांटे, ज्येष्ठ नेते अनंत साळवे, नगरसेवक किशोर कुंडू, सुभाष खोबे, विजय कुमरे, सरफराज शेख यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.
कोरची येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद
कोरची तालुक्यातील मतदान केंद्र क्रमांक 425 येथे डॉ.नेते यांनी भेट देऊन मतदान व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी माजी तालुकाध्यक्ष तथा भाजप नेते नसरुद्दीन भामाणी, तालुकाध्यक्ष सदाराम नुरोटी, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, देवराव गजभिये, आनंद चौबे, स्वप्निल कराळे, गणेश मुगनमारे, गोविंद दरवडे, जयदेव सहारे तसेच मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते.
कुरखेडा येथे बुथ व्यवस्थापनाचा आढावा
कुरखेडा तालुक्यातील मतदान केंद्र क्रमांक 423 व 424, तसेच तहसील कार्यालय परिसरातील मतदान व्यवस्थेचा आढावा घेताना डॉ.नेते यांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, ओबीसी नेते रविंद्र गोटेफोडे, अॅड.उमेश वालदे, सागर निरंकारी यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.
वडसा येथे मतदान केंद्रांना भेट
वडसा तालुक्यातील मतदान केंद्र क्रमांक 420, 421 व 422 येथे भेट देऊन डॉ.नेते यांनी मतदान नियोजनाची पाहणी केली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, ज्येष्ठ नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, तालुकाध्यक्ष सुनील पारधी, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, शहराध्यक्ष सचिन खरकाटे, राजू जेठानी, विस्तारक यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.
आरमोरी येथेही मतदान व्यवस्थेची पाहणी
आरमोरी तालुक्यातील मतदान केंद्र क्रमांक 426, 427 व 428 येथे डॉ.अशोक नेते यांनी भेट देऊन बूथ व मतदान नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी माजी आमदार कृष्णा गजबे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री अक्षय हेमके, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, भारत बावनथडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील सर्व मतदार, भाजपा व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संबंधित सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. सर्वांनी दाखविलेला उत्साह, सहकार्य आणि सहभाग याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
































