देसाईगंज : भाजपच्या महाजनसंपर्क अभियानांतर्गत शुक्रवारी देसाईगंज (वडसा) येथे खासदार अशोक नेते व आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात विकासतीर्थ अभियान राबविण्यात आले. यावेळी खासदार-आमदारांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वडसा रेल्वे स्थानकाला भेट देऊन रेल्वेशी संबंधीत रखडलेले जे प्रश्न मार्गी लावले त्याबद्दलची माहिती दिली. तसेच रेल्वेच्या आणखी काही समस्या जाणून घेतल्या.
यावेळी प्रामुख्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे निवडणूक प्रमुख प्रकाश सावकार पोरेडुीवार, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, अल्पसंख्याक आघाडीचे बब्बू हुसैनी, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील पारधी, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सदानंद कुथे, वडसा तालुकाध्यक्ष राजू जेठानी, आरमोरी तालुकाध्यक्ष नंदू पेठ्ठेवार, कुरखेडा तालुकाध्यक्ष नाजूक पुराम, कोरची तालुकाध्यक्ष नसरुद्दीन भामानी, जेष्ठ कार्यकर्ते रामभाऊ पडोळे, माजी जि.प. सभापती रोशनी पारधी, महिला तालुका अध्यक्ष जयश्री मडावी, प्रिती शंभरकर, अर्चाना ढोरे, ॲड.उमेश वालदे, उल्हास देशमुख, प्रा. अतुल झोडे, उमेश पाळदे, महामंत्री वसंता दोंनाडकर, विलास गावंडे, संतोष सामदासानी, लक्ष्मन रामानी, सदाराम ठाकरे, कैलाश पारधी, उमेश ढोरे, रविंद्र गोटेफोडे, ओंमकार मडावी, जगन्नाथ सरकार, धनराज पांडव आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
भारत माता की जय, वंदे मातरम्, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, अशा जयघोषांसह विकासतीर्थ अभियानातून केंद्र सरकारच्या कार्याची माहिती देण्यात आली.