नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावर गडचिरोलीत काँग्रेसची निदर्शने

देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करा- डॉ.उसेंडी

गडचिरोली : देशाच्या घटनेप्रमाणे या देशाच्या प्रथम नागरीक राष्ट्रपती आहेत. यावेळेस पहिल्यांदाच देशाला आदिवासी महिला राष्ट्रपती लाभल्या आहेत. नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्याचा हक्क नैतिकदृष्टया राष्ट्रपतींचा असतो. परंतू देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःचा उदो उदो करून घेण्यासाठी राष्ट्रपतींचे हक्क डावलून स्वतःच्या हाताने नवीन संसद भवनाचे उद्घाटन करीत आहे, असे सांगत काँग्रेसच्या वतीने शनिवारी येथील इंदिरा गांधी चौकात निदर्शने करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस, गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ.उसेंडी यांनी संसद भवनाचे उद्घाटन देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात यावे, असेही यावेळी सूचविले.

यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश महासचिव डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, शहर अध्यक्ष सतीश विधाते, शिक्षक सेलचे अध्यक्ष देवाजी सोनटक्के, प्रदेश प्रतिनिधी समशेरखान पठाण, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अँड.कविता मोहरकर, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, पांडुरंग घोटेकर, काशिनाथ भडके, उपाध्यक्ष अनिल कोठारे, तालुकाध्यक्ष वसंता राऊत, आदिवासी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवराम कुमरे, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव कुणाल पेंदोरकर, जिल्हाध्यक्ष परिवहन विभाग रुपेश टिकले, जिल्हाध्यक्ष सहकार विभागाचे भरत येरमे, माजी तालुकाध्यक्ष नेताजी गावतुरे, रामदास टिपले, लहुकुमार रामटेके, विधानसभा अध्यक्ष महेश जिल्लेवार, तसेच अपर्णा खेवले, कुसुम अलाम, प्रतीक बारसिंगे, जितेंद्र मुनघाटे, चोखजी भांडेकर, दीपक रामणे, लालाजी सातपुते, देवेन्द्र भोयर, रुपेश धकाते, मिलिंद बरसागडे, भुपेश नांदनकर, मोरेश्वर हजारे, अविनाश बांबोळे, भजनराव पदा, रवींद्र ठवकर, रामचंद्र सहारे, विक्रम गेडाम, कल्पना नादेश्वर, आशा मेश्राम, वंदना ढोक, बबिता उसेंडी, पौर्णिमा भडके, शशिकला मडावी, आरती कंगाले, शालिनी उईके, वनिता ताराम, मायाबाई उसेंडी, सुनीता उसेंडी, संजय गावडे, पंकज खोबे, दत्तात्रय करंगामी, अनुप कोहळे, शुभम किरमे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.