गडचिरोली : अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम आजपासून चार दिवस जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
गुरुवार, दि. 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता अहेरी येथील राजवाडा निवासस्थानी आगमन व मुक्काम. शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता चेरपल्ली येथे समाज मंदिराचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. 10.30 वाजता वांगेपल्ली येथे रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. 11.10 वाजता अहेरी येथे शहीद वीर बाबूराव शेडमाके यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थिती. सकाळी 11.30 ते 11.45 दरम्यान भगवान बिरसा मुंडा स्वागतद्वाराचे लोकार्पण केल्यानंतर दुपारी 1 वाजेपर्यंत राजवाडा निवासस्थानी राखीव राहिल. दुपारी 1.20 वाजता आलापल्ली येथे नाग मंदिरात दर्शन करून ते पेरमिलीकडे प्रयाण करतील. दुपारी 2.30 वाजता पेरमिली येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 4.30 वाजता शासकीय विश्रामगृह आलापल्ली येथे आगमन व राखीव. 5 वाजता आलापल्ली येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून अहेरीत मुक्काम करतील.
शनिवार, दि.10 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता प्राणहिता हेलीपॅड येथून हेलीकॉप्टरने सिरोंचाकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता तहसील कार्यालय सिरोंचा येथे विकास कामांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 12 ते 1.30 दरम्यान आसरअल्ली येथे विकास कामांचा आढावा घेतील. दुपारी 2.15 वाजता अंकिसा येथे विकास कामांचा आढावा घेऊन आरडा मार्गे सिरोंचाकडे प्रयाण करून स्नेहधर्म निवासस्थान, सिरोंचा येथे मुक्काम करतील.
रविवार, दि.11 ऑगस्ट 2024 रोजी सिरोंचा येथून सकाळी 9 वाजता बामनी (व्यंकटापूर) येथे आगमन. दुपारी 12 ते 2.30 दरम्यान रंगयापल्ली येथे भेट, तर 2.30 वाजता सुर्यापल्ली येथे राष्ट्रीय महामार्गावर बांधकाम केलेल्या पुल व रस्त्यांची पाहणी करतील. दुपारी 3.15 वाजता नगरम येथे विकास कामांचा आढावा घेऊन सायंकाळी 4.45 वाजता सिरोंचा येथून हेलिकॉप्टरने अहेरीकडे रवाना होऊन मुक्काम करतील.