1980 च्या वनकायद्यात शिथिलता आणून रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती द्या

खा.डॉ.किरसान यांचे केंद्रीय मंत्र्यांना साकडे

गडचिरोली : खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री भूपेंदर यादव यांची बुधवारी दिल्ली येथे भेट घेतली. वन कायाद्यामुळे रखडलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कारवाफा, डुमीनाला, डरकानगुडा, पिपरी रिठ, पुलखल, तुलतुली, चेन्ना हे वनबाधित सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वन संरक्षण कायदा 1980 ला शिथिल करून प्रकल्पांना मंजुरी देण्याची विनंती त्यांनी केली.

यावेळी त्यांनी गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रात सतत असलेला वाघांचा व रानटी हतींचा धुमाकूळ थांबवून होणारी जीवित हानी रोखण्यासाठी या हिंस्त्र प्राण्यांना इतर ठिकाणी हलवून कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची विनंती केली. याशिवाय पिकांची नासाडी करणाऱ्या व जीविताला धोका निर्माण करणाऱ्या रानटी डुकरांचासुद्धा बंदोबस्त करावा, अशी मागणी डॉ.किरसान यांनी वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली.