गडचिरोली : महाराष्ट्र राज्य जंगल कामगार सहकारी संघ पुणे स्थित नागपूरच्या संचालक मंडळाची निवडणूक २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी पार पडली. या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये घनश्याम लहुजी मडावी यांची अविरोध निवड झाली. विशेष म्हणजे सलग तिसऱ्या वेळी ते राज्य संघावर संचालक म्हणून निवडून गेले आहेत.
मडावी हे सहकारी क्षेत्रात राज्य व जिल्हा पातळीवरील विविध संस्थांचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सहकार, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात त्यांनी विधायक कार्य केले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची व योगदानाची दखल घेऊन नवी दिल्लीतील इंडिया असोसिएशन पॅाप्युलेशन अॅन्ड डेव्हलपमेंट सभागृहात ४ मार्च २०१६ रोजी आयोजित कार्यक्रमात तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री मोहनभाई कुंडरिया आणि केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांच्या हस्ते त्यांना उत्कृष्ट सहकारी बंधू पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
त्यांची या तिसऱ्यांदा झालेल्या निवडीबद्दल सहकार चळवळीतील चाहत्यांनी आनंद व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले.