गडचिरोली : निर्भय बनो विचारमंच आणि समविचारी संघटनांच्या वतीने शुक्रवारी (दि.२३) गडचिरोलीत सुप्रसिद्ध विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॅा.विश्वंभर चौधरी तथा संविधान तज्ज्ञ व कायद्याचे विश्लेषक अॅड.असिम सरोदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे.
सायंकाळी ५ वाजता गडचिरोलीच्या गांधी चौकातील भारतरत्न राजीव गांधी सभागृहाच्या प्रांगणात ही जाहीर सभा होणार आहे. विद्यमान सामाजिक परिस्थितीवर हे वक्ते मंथन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू आहे. या वैचारिक मंथनाचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.