पोलिस विभागाच्या जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेत जांबियाची किरण अव्वल

आश्रमशाळेने सत्कार करत केले कौतुक

गडचिरोली : पोलिस दल, पोलिस दादालोरा खिडकी यांच्या माध्यमातून प्रोजेक्ट प्रयासअंतर्गत घेण्यात आलेल्या वीर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात शासकिय आश्रमशाळा जांबिया (गट्टा) येथील किरण लक्ष्मण आतलामी या विद्यार्थिनीने गडचिरोली जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.

एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी गटृटा जांबिया या परिसरातील जांबिया येथे शिक्षण घेत असलेली किरण आतलामी ९ व्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. परिस्थितीवर मात करुन तिने जिल्ह्यात सामान्य ज्ञान स्पर्धेत भाग घेवुन गडचिरोली जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिला पाच हजार रुपयांचे बक्षीस देवुन गौरविण्यात आले.

आश्रमशाळा जांबिया येथील शिक्षक व गावातील नागरिकांनी सत्कार करुन तिचे कौतुक केले.