गडचिरोली : भाजपचे प्रदेश अध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गडचिरोली येथील वृद्धाश्रमात सोमवार, दि.13 रोजी धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. याशिवाय महिला रुग्णालयात फळ वाटप आणि शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. महिला आघाडीच्या प्रदेश सचिव रेखा डोळस यांच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी शहरातील अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
भाजप महिला आघाडीच्या वतीने वृद्धाश्रमात धान्याच्या किटचे वाटप
बावनकुळे यांच्या वाढदिवसाचे निमित्त