चामोर्शी : तालुक्यातील नागरिकांच्या समस्या, अडीअडचणी जाणून घेऊन नागरिकांशी संपर्क वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयात खासदार अशोक नेते यांनी नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी सेवानिवृत्त नायब तहसीलदार हनुमंत डंबारे यांनी खा.नेते यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.
वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर खासदार नेते यांनी रविवार, दि. २९ रोजी चामोर्शीतील जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. यावेळी चामोर्शी तालुक्यातील पदाधिकारी आणि नागरिकांशी चर्चा केली.
याप्रसंगी खासदार भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, माजी जि.प. अध्यक्ष तथा भाजपाचे नेते समया पसुला, तालुका अध्यक्ष आनंद भांडेकर, शहराध्यक्ष सोपान नैताम, कृ.उ.बा.समितीचे संचालक रमेश बारसागडे, बंगाली आघाडीचे नेते दीपक हलदार, जेष्ठ नेते माणिक कोहळे, आदिवासी आघाडीचे महामंत्री रेवनाथ कुसराम, ओबीसी मोर्चाचे जिल्हा महामंत्री भास्कर बुरे, नरेश अलसावार, विजय गेडाम, राजू धोडरे, शेषराव कोहळे, वासुदेव चिचघरे, विलास चरडूके, डोमदेव वनेवार, निरज रामानुजमवार, तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.