गडचिरोली : राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीने प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रीय हातमाग सप्ताह 4 ते 10 ऑगस्ट 2023 पर्यंत साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने महिला मोर्चा गडचिरोलीच्या वतीने जिल्हा प्रभारी योगिता पिपरे यांच्या नेतृत्वात कारागिर महिलांचा सत्कार केला जात आहे.
याअंतर्गत 4 ऑगस्ट 2023 रोजी गडचिरोली शहरातील गोकुळनगर वार्डातील व शिख मोहल्ल्यातील हाताच्या कर्तृत्वाने बांबूपासून टोपली, डाले, गोले, ताटवे, बेंदवा तथा अन्य वस्तू तसेच टिनाच्या पत्र्यापासून सूप, पायली, किसनी, टीप, कोठी, केरपत्रा इत्यादी वस्तू तयार करणाऱ्या होतकरू महिलांचा सत्कार महिला मोर्चाच्या जिल्हा प्रभारी योगीता पिपरे यांच्या हस्ते करण्यात आला.
गोकुळनगर शिख मोहल्ल्यातील टिनाच्या वस्तू तयार करणाऱ्या चांदकौर दुधानी, सुंदरकौर राजूसिंग दुधानी तसेच बांबूपासून विविध वस्तू बनविणाऱ्या निर्मला योगेश मांडवकर व कांचन मांडवकर यांचा, तसेच मातीपासून विविध वस्तू व मुर्ती बनविणारे ज्येष्ठ नागरिक मुखरू जोदरू पाथर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, जिल्हा सचिव प्रतिभा चौधरी, शहर अध्यक्ष कविता उरकुडे व इतर पदाधिकारी महिला उपस्थित होत्या. शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी महिला मोर्चाच्या शहर महामंत्री वैष्णवी नैताम, माजी नगरसेविका नीता उंदिरवाडे, पुष्पा करकाडे, शहर महामंत्री रश्मी बाणमारे, मंदा मांडवगडे, पूनम हेमके, लक्ष्मी कलंत्री, राजूसिंग शेरसिंग दुधानी, जगजीत कौर उपस्थित होते.