अभाआविपच्या गडचिरोली जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी वर्षा आत्राम

गडचिरोली : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्लीच्या गडचिरोली जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी वर्षा अशोक आत्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिदुर्गम, आदिवासीबहुल समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी आपण काम करणार असल्याची भावना वर्षा आत्राम यांनी व्यक्त केली.

सदर निवड अभाआविपचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.सोमजीभाई डामोर, राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी मंत्री अॅड.शिवाजीराव मोघे आणि राष्ट्रीय महिला अध्यक्ष उर्मिलासिंह मार्को, प्रदेश अध्यक्ष राम चव्हाण यांच्या अनुमोदनातून महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रदेश अध्यक्ष नंदिनी राजेश टारपे यांच्याकडून करण्यात आली. प्रदेश महासचिव तथा आदिवासी सेवक केशव तिराणिक, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष जनार्धन गेडाम, सुनिता मरस्कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय कार्यकारी सदस्य जनार्धन पंधरे यांच्या हस्ते त्यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले.