गडचिरोलीच्या स्टेडियम ग्राऊंडवर दिसला आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह

खासदार अशोक नेते यांची विशेष उपस्थिती

गडचिरोली : योग आहे आरोग्यासाठी क्रांती, नियमित योगामुळे जीवनात येते सुख-शांती. आरोग्यम् धनसंपदा, करो योग, रहो निरोग असा संदेश देत बुधवारी गडचिरोलीतील स्टेडियम ग्राऊंडवर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी खासदार अशोक नेते यांनी सहभागी होऊन योगाभ्यास करत उपस्थितांचा उत्साह वाढविला.

संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्याअनुषंगाने व्यक्तीच्या शारीरिक आणि आध्यात्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यभूत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून बुधवारी गडचिरोली स्टेडियम ग्राउंडवर खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात योग दिन साजरा करण्यात आला.

यावेळी प्रामुख्याने भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, योग शिक्षक अनिल निकोडे, योग शिक्षक खुशाल म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, प्रशांत भुगुवार, अनिल कुनघाडकर, सचिन तंंगडपल्लीवार, केशव निंबोड, राकेश शेरकी, राकेश राचमलवार, हर्षल गेडाम, तसेच कार्यकर्ते व मोठ्या संख्येने युवा वर्ग या योग शिबिराला उपस्थित होता.

या शिबिराच्या निमित्ताने योग शिक्षक अनिल निकोडे, खुशाल मस्के यांचा शाल, श्रीफळ देऊन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.