गडचिरोली शहरात आता भाजपचा ‘घर चलो अभियाना’तून महाजनसंपर्क

खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात दिली गती

गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्वत्र मोदी @९ याअंतर्गत महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरूवार दि.२२ पासून गडचिरोली शहरात खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात घर चलो अभियानाला सुरूवात करण्यात आली. यात घरोघरी जाऊन केंद्र सरकारने नऊ वर्षात केलेल्या कामांविषयीची माहिती नागरिकांना देण्यात येत आहे.

या अभियानात खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, एसटी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री केशव निंबोड, विनोद देवोजवार, अनिल पोहणकर, अनिल कुनघाडकर, विवेक बैस, हर्षल गेडाम, महिला मोर्चाच्या महामंत्री वर्षा शेडमाके, विजय शेडमाके, आशुतोष कोरडे, श्रीकांत पत्रे, तसेच मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.