गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत कोरची तालुक्यातील कोटगुल येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या मैदानावर आयोजित आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनाचा समारोप रविवारी झाला. या क्रीडा स्पर्धेत कारवाफा बीट विजेता, तर सोडे बीट उपविजेता ठरला. विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले.
आदिवासी विकास विभागात पहिल्यांदाच गडचिरोली प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. या स्पर्धांचे पारितोषिक वितरण सहाय्यक प्रकल्प अधिकारी वहीद शेख यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोटगुल आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एस.एम.कुळसंगे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विभा बागडे, कारवाफा आश्रमशाळेचे मुख्याध्यापक विष्णू चव्हाण, रोशन पेंदाम, बालकिसन चिंतल उपस्थित होते.
विजेत्या कर्मचाऱ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बीटमधील 24 शासकीय आणि 17 अनुदानित अशा एकूण 41 आश्रमशाळा, तसेच 21 शासकीय वसतीगृह व प्रकल्प कार्यालयासह जात पडताळणी कार्यालयातील सुमारे 300 कर्मचाऱ्यांनी सदर प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनात सहभाग घेतला. कबड्डी, व्हॉलीबॉल, हँडबॉल, क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, गोळाफेक, भालाफेक, धावणे या खेळांचे आयोजन महिला व पुरुष कर्मचारी गटात करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विभागीय क्रीडा उपसमन्वयक नेताजी गावड यांनी केले. आभार प्रदर्शन डी.बी.पदा यांनी केले.
क्रीडा संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, समन्वयिका प्रमिला दहागावकर, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, क्रीडा मार्गदर्शक आशिष नंदनवार, रविकांत पिपरे, कृपांती बोरसरे, प्रवीण पोटावी, संतोष गैनवार, अजय वाकडे, पवन मेश्राम, वंदना महल्ले, निर्मला हेडो, नितेश नेवारे, अधीक्षक पी.एन.पडवे, अधीक्षिका एस.सी.चवरे, ए.एस.करंगामी, मोहिनी कडते , एस.एस. शिवरकर, एन.जी. कुलसंगे, आर.एस.कोरचा, विनोद दिवटे, सोनल कुळसंगे, शैलेश भैसारे, सुधीर मशाखेत्री, सचिन भालेकर, विलास पोटावी, विशाल घुंमरे, अमित मेश्राम, गुलाब हर्षे, नितीन साठवणे, वर्षा मस्के, प्रीती खंडाते, शारदा पेदापल्ली, देविदास कुमरे, निखिल भोयर, एस.एस.धुडसे, अतुल बलगुजर आदींसह कोटगुल आश्रमशाळेतील व पाचही बिटातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
































