गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी समाजातील डॉक्टरांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली ट्रायबल डॉक्टर्स असोसिएशन (GTDA)ची स्थापना करण्यात आली. या निमित्ताने प्रथमच रविवारी (दि.19) जिल्हास्तरीय डॉक्टर्स डे उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील सुमारे 213 आदिवासी डॉक्टर विविध शासकीय व वैद्यकीय संस्थांमध्ये कार्यरत आहेत. त्यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी व पोलीस रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील मडावी यांच्या संकल्पनेतून ‘जीटीडीए’ची स्थापना करण्यात आली.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील 200 हून अधिक आदिवासी डॉक्टर उपस्थित होते. जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी दीर्धकालीन मास्टर प्लॅन तयार करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या कार्यक्रमात अहेरी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कन्ना मडावी व डॉ.समता मडावी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सहपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार डॉ.मिलंद नरोटे, माजी आमदार डॉ.देवराव होळी, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, डॉ.पुरुषोत्तम मडावी (उपसंचालक, मुंबई), डॉ.दीपचंद सोयाम (उपसंचालक), डॉ.राजेंद्र सुरपाम (उप-अधिष्ठाता, चंद्रपर), डॉ.दिलीप कुमरे (विभाग प्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर), डॉ.छाया उईके (ACS), डॉ.वसंत कुमरे (कमांडंट CRPF), डॉ.माधुरी किलनाके, डॉ.प्रविण किलनाके आणि डॉ.रजनी तोरे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ.तारकेश्वर उईके, डॉ.संदीप किरंगे, डॉ.सोनल कोवे, डॉ.मनोहर मडावी, डॉ.आशिष शेडमाके, डॉ.उमेश सिडाम आणि डॉ.पुरुषोत्तम कुमरे, डॅा.नितीन मसराम, डॅा.प्रज्ञा मसराम यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रियंका शेडमाके, डॉ.प्रियदर्शनी कोडापे, डॉ.प्रतिभा वट्टी आणि डॉ.एकता कुमरे यांनी, तर डॉ.चेतन कोवे व डॉ.केतन कुभरे यांनी आभार मानले.
































