Home राजकीय घडामोडी पोटगावच्या विद्यार्थ्यांसोबत रमले माजी आमदार कृष्णा गजबे

पोटगावच्या विद्यार्थ्यांसोबत रमले माजी आमदार कृष्णा गजबे

वाढदिवसानिमित्त साहित्याचे वाटप

देसाईगंज : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी आपला वाढदिवस स्वगावी पोटगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळकरी विद्यार्थ्यांना साहित्य वाटून साजरा केला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांसोबत रमून गजबे यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

विद्यार्थ्यांना नोटबुक व गोड भेटीचे वाटप करताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मन समाधानाने भरून आले. शिक्षण हीच जीवनातील सर्वात मोठी ताकद आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने मनापासून अभ्यास करून आपले आई-वडील, गाव आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, असा संदेश यावेळी मा.आ.गजबे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिला. समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी लक्षात ठेवून वाढदिवसासारखे क्षण समाजोपयोगी उपक्रमातून साजरे करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.

याप्रसंगी केंद्रप्रमुख पांडे, मुख्याध्यापिका मस्के, नरेश हरडे, महेंद्र सोनपिपरे, गणपत वाघाडे, किरण बनसोड, शिक्षकवृंद सांगोळे, गृहकर, पेटकुले, नरेश श्रीरामे, चंद्रकांत रणदिवे, शहारे यांच्यासह इतर सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.