गडचिरोली : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे हे दि.9 व 10 सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विविध शाळांना भेटी देऊन ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणार आहेत.
ना.भुसे यांचे बुधवार, दि.9 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन होईल. त्यानंतर त्यांचा वेळ राखीव असून गडचिरोली येथे मुक्काम राहील.
गुरुवार, दि.10 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ते जिल्ह्यातील शाळांना भेटी देणार आहेत. त्यानंतर दुपारी 1 वाजता समाजकल्याण भवन सभागृह, गडचिरोली येथे आयोजित ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीबाबतच्या आढावा बैठकीस ते उपस्थित राहतील.
दौरा आटोपल्यानंतर सायंकाळी 7 वाजता दादाजी भुसे हे गडचिरोली येथून शासकीय वाहनाने चंद्रपूरकडे प्रयाण करतील.
































