अस्थिव्यंगांना विविध साहित्य देण्यासाठी गडचिरोलीत उद्या तपासणी शिबिर

१०० लाभार्थ्यांची निवड करणार

गडचिरोली : जिल्ह्यातील अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तिंना विविध साहित्य देण्यासाठी लाभार्थींची निवड केली जात आहे. मंगळवार आणि बुधवारी अनुक्रमे आलापल्ली व कुरखेडा येथे शिबिर पार पडल्यानंतर गुरूवारी (दि.११) जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे निवड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

धानोरा, मुलचेरा, चामोर्शी आणि गडचिरोली अशा चार तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी हे शिबिर आहे. यात ज्यांना कृत्रिम हात, कृत्रिम पाय किंवा कॅलिपर्सची गरज आहे अशा १०० लाभार्थींची निवड या शिबिरातून केली जाणार आहे.

गडचिरोली जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने आणि रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई तथा जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र गडचिरोली यांच्या सहकार्याने हे शिबिर घेतले जात आहे.