धान खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीला पुन्हा मिळाली १५ दिवसांची मुदतवाढ

आ.गजबेंच्या मागणीला भुजबळांचा प्रतिसाद

देसाईगंज : खरीप हंगामातील शासकीय धान खरेदीसाठी शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करण्यास ३१ जानेवारीपर्यंत देण्यात आलेली मुदतवाढ संपल्याने धान विक्रीचा पेच निर्माण झाला होता. शेतकरी, केंद्र संचालकांनी ‘कटाक्ष’मार्फत ही समस्या मांडली होती. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा मुदतवाढ देणे गरजेचे असल्याचे पटवून दिले. त्यांची विनंती मान्य करत ना.भुजबळ यांनी ऑनलाईन नोंदणीला १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदतवाढ ३१ जानेवारी २०२३ पर्यंत वाढवून देण्यात आली होती. मात्र जानेवारी महिन्यात १३ दिवस पोर्टल ठप्प पडल्याने नोंदणी होऊ शकली नाही. त्यामुळे बरेच शेतकरी नोंदणीपासून वंचित होते. आता मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.