देसाईगंज : संत निरंकारी मंडळ शाखा वडसा (देसाईगंज)च्या वतीने शुक्रवारी संत निरंकारी सत्संग भवन, देसाईगंज येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यात 213 पुरुष आणि 36 महिला अशा एकूण 249 लोकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते आणि संत निरंकारी मंडळाचे झोनल इंचार्ज किशन नागदेवे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी संयोजक आसाराम निरंकारी, सेवादलाचे क्षेत्रीय संचालक हरिष निरंकारी, सदानंद कुथे, मोतीलाल कुकरेजा, डॉ.सम्मी शेख, डॉ.रवी मोटवानी, डॉ.सचिन कारंजेकर प्रामुख्याने उपस्थित होते. रक्तदान हे महान सेवाकार्य आहे, दुसऱ्यांचा जीव वाचविण्याचे काम ज्यातून घडते असे हे महान दान आहे, त्यामुळे यासाठी सर्वांनीच आपले योगदान द्यावे, अशी भावना यावेळी मा.आ.कृष्णा गजबे यांनी व्यक्त केली.
संत निरंकारी मंडळाद्वारे 24 एप्रिलला सद्गुरू बाबा गुरबचन सिंहजी महाराज तथा अन्य हुताम्यांना श्रद्धांजली देण्यासाठी ‘मानव एकता दिवस’ साजरा करण्यात येतो. त्याच दिवशी सर्व जिल्हा केंद्र किंवा इतर मुख्य ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करून श्रद्धांजली दिली जाते. त्यानंतर सर्व विश्वभरात आवश्यकता व सोईनुसार रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते.
रक्तपेढी जिल्हा रूग्णालय यांनी रक्त टंचाई झाल्यामुळे मंडळाला रक्तदान शिबिरासाठी विनंती करताच मंडळाद्वारे मानवसेवेसाठी तातडीने रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याचे यावेळी किशन नागदेवे यांनी आपल्या अध्यक्षीय संबोधनात सांगितले.
या शिबिराला माजी आमदार डॉ.देवराव होळी, पोलीस निरिक्षक अजय जगताप, रवी ओल्लारवार, हेमंत बोरकुटे आदींनी भेट देवून रक्तदात्यांना प्रोत्साहित केले.
रक्त संकलनासाठी रक्तपेढीचे डॉ.प्रणय कासे, गणेश सावळे, राहुल सिडाम, स्वाती मरसकोल्हे, राहुल वाळके, स्वप्निल चापले, समता खोब्रागडे, धिरज खेवले, प्रमोद देशमुख, राजकुमार भगत, बंडू कुंभारे तसेच रक्तपेढी भंडारा येथील डॉ.मीरा सोनवाने, प्रशांत बडोले, सना शेख, खुशाल झाडे, राजु नागदेवे, लोकेश गोटेफोडे, शरद जांभुळे, राहुल गिरी, शुभम गजभिये यांनी परिश्रम घेतले. तसेच स्थानिक ग्रामीण रूग्णालयाच्या रक्त तपासणी चमुने सर्व रक्तदात्यांची तपासणी केली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सेवादलच्या सर्व स्त्री-पुरुष सदस्यांनी गणवेशात शिस्तबद्धपणे परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरीश निरंकारी, संचालन नानकराम कुकरेजा यांनी तर आभार प्रदर्शन पुरुषोत्तम डेंगानी यांनी केले.