Home दैनंदिन बातम्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत आरोही चव्हाण व सार्थक गेडाम चॅम्पियन

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत आरोही चव्हाण व सार्थक गेडाम चॅम्पियन

5 ते 25 वर्षे गटातील स्पर्धक सहभागी

विजेत्यांना बक्षीस वितरण करताना अतिथी

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा अॅम्युचर क्रीडा कराटे डो असोसिएशनच्या वतीने 17 वी गडचिरोली जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा घेण्यात आली. यात मुलींमधून आरोही चव्हाण, तर मुलांमधुन सार्थक गेडाम यांनी जिल्हा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा बहुमान मिळविला. याशिवाय इतर अनेक विद्यार्थ्यांनी विविध पदकं प्राप्त केली.

स्पर्धेचे उद्धाटन प्रशांत वाघरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ओमप्रकाश संग्रामे, गोविंद सारडा, लिलाधर भरडकर, ऋषिकांत पापडकर, अविनाश वरगंटीवार, रुपराज वाकोडे तसेच कपिल बागडे उपस्थित होते.

या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत जिल्ह्याभरातील 250 खेडाळूंनी सहभाग नोंदविला. ही स्पर्धा 5 ते 25 वर्षे वयोगटातील मुले आणि मुली अशा गटात घेण्यात आली.

यावेळी मागील वर्षी एसजीएफ राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्या खेडाळूंना सन्मानित करण्यात आले. तसेच बेस्ट फायटर आर्यन बावणे, क्रिश लोणारे, मैथिली जुवारे, पार्थ गेडाम व उत्कृष्ट खेडाळू म्हणून कृष्णा काबरा यांना ट्राफी देऊन गौरविण्यात आले.