Home दैनंदिन बातम्या निसर्गरम्य मुतनूरच्या दुर्गा मंदिर देवस्थानात यावर्षीही महाप्रसाद

निसर्गरम्य मुतनूरच्या दुर्गा मंदिर देवस्थानात यावर्षीही महाप्रसाद

खुणे परिवारातर्फे उत्साहात आयोजन

चामोर्शी : तालुक्यातील निसर्गरम्य मुतनूरच्या पहाड परिसरातील आदिशक्ती दुर्गामाता मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खुणे कंन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रमुख प्रणय खुणे यांच्या गुरनोली येथील परिवारातर्फे नवरात्रीनिमित्त महाप्रसाद वितरण करण्यात आले.

या मंदिरात गेल्या अनेक वर्षापासून नवरात्रीला संपूर्ण मुतनूर व परिसरातील नागरिकांकरिता महाप्रसादाचे वितरण आणि बालिका पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या भागातील सर्व बालिकांना स्नेहभेट म्हणून विविध भेटवस्तू वाटप करण्यात येतात. यावर्षी सुद्धा महाप्रसाद वितरण पहांदी पारी कुपार लिंगो देवस्थान मुतनूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील भाविकांनी सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. खुणे कंन्स्ट्रक्शन कंपनी व एल.एल.डोंगरवार कन्स्ट्रक्शन कंपनीचे संस्थापक प्रणय खुणे व संचालक लोकेश डोंगरवार, राकेश डोंगरवार, दिनेश खुणे, तसेच राहुल झोडे, मार्गदर्शक प्रमोद आसूटकर, पुरुषोत्तम गोबाडे, ग्रामसभा पुसेर, ग्रामसभा मतनूर येथील पदाधिकारी व कार्यकर्ते आणि खुणे कन्स्ट्रक्शन कंपनीचे सर्व पदाधिकारी, वाहन चालक आणि कार्यकर्ते, तसेच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, उपाध्यक्ष नानू उपाध्ये, दिनेश मुजुमदार, विलास सावकार वडेट्टीवार, मास्टर नोनी हलदार आदी यावेळी उपस्थित होते.