गोंदियात धर्मरावबाबा आत्राम तर गडचिरोलीत जिल्हाधिकारी दैने करणार ध्वजारोहण

महाराष्ट्र दिनाचा शासकीय सोहळा उद्या

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार, दि. 1 मे 2024 रोजी सकाळी 8 वाजता गडचिरोलीत पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

दरम्यान राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा गोंदियाचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम हे गोंदिया येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर शासकीय ध्वजारोहण करणार आहेत. ना.आत्राम सध्या गडचिरोली दौऱ्यावर आहेत. दि.30 दुपारी ते हेलिकॅाप्टरने गोंदियाला मुक्कामी जातील. दि.1 मे रोजी शासकीय ध्वजारोहणानंतर गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून खासगी विमानाने मुंबईला रवाना होतील.