गडचिरोली : जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राच्या वतीने एमपीएससी, आयबीपीएस, एसएससी तसेच जिल्हा निवड समितीअंतर्गत विविध पदभरतीबाबत स्पर्धापूर्व प्रशिक्षण विनामुल्य देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी 1 ते 29 जुलैपर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल, बॅरेक क्र.2 गडचिरोली येथे अर्ज सादर करावयाचे आहे.
अर्ज सादर करणाऱ्यांच्या 30 जुलै रोजी मुलाखती घेण्यात येईल. त्यातून उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे. प्रशिक्षण प्रवेश पात्रतेसाठी शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र व रोजगार नोंदणी कार्ड असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महीने असून प्रशिक्षणदरम्यान एक हजार रुपये दरमहा विद्यावेतनही दिले जाईल. प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या उमेदवारांना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येते. अधिक माहितीसाठी 8485814488 या क्रमाकांवर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.