Home दैनंदिन बातम्या कन्हारटोला येथे हनुमान मूर्ती व शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळा

कन्हारटोला येथे हनुमान मूर्ती व शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळा

मा.आ.गजबे यांची विशेष उपस्थिती

कुरखेडा : तालुक्यातील कन्हारटोला येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने हनुमानाची मूर्ती, शिवलिंग प्राणप्रतिष्ठा व कलशारोपण सोहळा अत्यंत धार्मिक आणि उत्साही वातावरणात पार पडला. या मंगलमयी सोहळ्यानिमित्त गावात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्याला माजी आमदार कृष्णा गजबे यांनी विशेष उपस्थिती होती. त्यांच्यासोबत भाजपचे तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत नागीलवार, भाजपा आदिवासी आघाडीचे तालुकाध्यक्ष रमेश पुराम प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना मा.आ.गजबे व चांगदेव फाये यांनी धार्मिक कार्यांतून सामाजिक एकता कशी जोपासली जाते, यावर विचार मांडले. या कार्यक्रमादरम्यान त्यांचा आणि सोहळ्याचे यजमान नंदकिशोर दोनाडकर दांपत्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या सोहळ्याला गावातील प्रतिष्ठित नागरिक तेजराम बाळबुद्धे, नितीन कुथे, दत्तु करमकार, जाईबाई दोनाडकर, मुकुंदा अत्तरगडे, सदाराम होळी, सुकलाल दूधकुवर, पुसाऊ बेलवाती, नारद फुलकवर, उमाजी करमकार, दिनकर कोराम महाराज, ज्वालाप्रसाद सांगसुरवार, घनश्याम साफा, अनवारी करिवार, सुरेश दूधकुवर, लता करमकार, गजरी दुधकुवर, अनिता दुधकुवर, देवतीन साफा, नीता पुळो, सैजा हलामी, संगीता दुधकुवर, सलेंद्री सांगसुरवार, रमलो कारिपाल, बाबुराव दूधकुवर यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन वासुदेव पुळो यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कन्हारटोला येथील युवक मंडळ, महिला भगिनी आणि बालगोपाळांनी परिश्रम घेतले. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.