राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने दिला शेतकऱ्यांच्या उपोषणाला पाठिंबा

पोशिंद्याची समस्या दूर करण्याची मागणी

देसाईगंज : राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे यांनी देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या वीज पुरवठ्यासह सर्व समस्या दूर व्हाव्या यासाठी उपोषण मंडपात जाऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. शेतकरी वर्ग हा जगाचा पोशिंदा आहे. त्याच्या समस्या प्राधान्याने दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या विजेची समस्या सरकारने सोडवून त्यांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी श्याम मस्के यांच्यासह युवा शेतकरी मुन्ना दहाडे, देवानंद खुणे, अंकुश बुद्धे हे उपोषणाला बसले असताना प्रणय खुणे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी मानवाधिकार संघटनेचे प्रवक्ते ज्ञानेद्र बिस्वास, विदर्भ अध्यक्ष जावेद अली, जिल्हा उपाध्यक्ष व्यंकटेश मारगोणी, भामरागड तालुकाध्यक्ष भीमराव वनकर, महिला विदर्भ अध्यक्ष पायल कापसे, तालुका अध्यक्ष नितीन बनसोड, प्रशांत मंडल (चामोर्शी), मधुकर कोवासे (आरमोरी), सुनील नांदनवार, विनोद कोरेटी (कोरची), राजेंद्र चिमडालवार, मंगेश कराडे (कुरखेडा), बबलू माधव दास (मुलचेरा) हेसुद्धा उपस्थित होते. यांनी शेतकऱ्यांना आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगत वीज पुरवठ्याची समस्या दूर व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.