माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते विविध ठिकाणी ध्वजारोहण

गडचिरोली : आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे नेते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते कृषि उत्पन्न बाजार समिती व पुष्पप्रियादेवी शाळा किस्टापूर या ठिकाणी स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी बाजार समिती उपसभापती रवींद्र बाबा आत्राम, सचिव महेश गुप्ता, सहसचिव हेमंत देशमुख, लेखापाल शामराव बोंमनवार, निरीक्षक महेश गद्देवार, कर्मचारी मयूर गुम्मूलवार, तिरुपती अय्यला, तसेच लीलाधर गोधारे, जीवन तलांडे, संतोष दोतुलवार, सचिन बिरेल्लीवार, प्रकाश मद्दीवार, श्रीनिवास गददेवार, राजू मद्देर्लावार, मलरेड्डी ओडेट्टीवार, प्रशांत आईलवार, महेश गड्डमवार, रवी जन्नमवार, साबय्या तुमडे, सतीश पर्वतालवार तसेच पुष्पप्रियादेवी शाळा किस्टापूर व बाजार समितीचे सर्व पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.