ट्रॅक्टर मालकाकडून १२ हजारांची लाच घेणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात

सततच्या कारवाया, पण लाचखोरी थांबेना

आरमोरी : मुरमाची अवैधपणे वाहतूक करताना पकडलेल्या ट्रॅक्टरवर कायदेशिर कारवाई न करता सोडून देण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातल्या वडधा येथे गडचिरोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. रमेश महागू कवडो असे लाच घेणाऱ्या तलाठ्याचे नाव आहे. त्याने १५ हजार रुपयांची मागणी केली होती, पण तडजोडीनंतर त्याने १२ हजार रुपये घेतले. त्याच्याविरूद्ध आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.