खासदार अशोक नेते यांच्या हस्ते गडचिरोलीत विविध ठिकाणी ध्वजारोहण

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उत्साह

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त खासदारांचे जनसंपर्क कार्यालय, शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय आणि शिवकृपा पतसंस्था या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार, देशप्रेमाने प्रेरित होऊन, बलशाली भारत देशाचा अभिमान बाळगत, भारत मातेचा जयजयकार करून आपण हा दिवस आनंदाने साजरा करूया. योग्य नेतृत्वामुळे देशाचे भविष्य आणखी उज्वल होईल, असा विश्वास व्यक्त करत खा.नेते यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पूर्ण झाल्यानिमित्ताने नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, जेष्ठ नेते रमेश भुरसे, सुधाकर येनगंधलवार, गजानन येनगंधलवार, अनिल कुनघाडकर, अनिल तिडके, मुक्तेश्वर काटवे, विनोद देवोजवार, विवेक बैस, अनिल करपे, योगिता पिपरे, वर्षा शेडमाके, प्राचार्य दुर्गम, तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवकृपा कनिष्ठ महाविद्यालयात ध्वजारोहणप्रसंगी खा.अशोक नेते यांच्यासह शिक्षकवृंद आणि विद्यार्थी.