‘कटाक्ष’च्या बातमीची दखल, कोरचीतील गैरहजर कर्मचाऱ्यांना बजावली नोटीस

जि.प.च्या कार्यकारी अभियंत्यांनी माहिती

गडचिरोली : कोरची या तालुका मुख्यालयी असलेल्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाच्या कार्यालयाचा कारभार अधिकारी-कर्मचारी कुरखेडा येथूनच पाहात असल्याचा प्रकार कॅमेराबद्ध झाल्यानंतर आणि तो ‘कटाक्ष’ने दाखविल्यानंतर जिल्हा परिषदेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी जि.प.च्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय दोरखंडे यांनी कोरची उपविभागाच्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत याप्रकरणी खुलासा मागितला आहे.

गेल्या सोमवारी या कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने सहजपणे बोलताना कोरचीतील कार्यालयात कर्मचारी हजरच नसतात. ते कुरखेडा येथून कारभार पाहतात असे सांगितले होते. याचा व्हिडीओ कटाक्षने दाखविल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली. सीईओ आयुषी सिंह यांनीही याप्रकरणी गंभीर दखल घेतली.

यासंदर्भात हाय्यक अभियंता बी.सी. धार्मिक यांनी कर्मचाऱ्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रत्यक्षात काय स्थिती आहे हे कर्मचाऱ्यांचे उत्तर आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.