Home दैनंदिन बातम्या जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार

जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार

शिक्षक दिनानिमित्त केले आयोजन

गडचिरोली : भारताचे माजी राष्ट्रपती, शिक्षणतज्ज्ञ तथा ‘भारतरत्न’ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त, शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार व सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

प्रारंभी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षकवृंद गुरुदास बोडे, दीपक पाटील, यशवंत रायपुरे, चव्हाण, रवींद्र बांबोळे, राजेंद्र मुळे, बोमनवार, दीपक गडपल्लीवार आणि अविनाश गौरकार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीचे खरे शिल्पकार आहेत. विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार, मूल्ये आणि जीवनाची योग्य दिशा देण्याचे पवित्र कार्य शिक्षक आयुष्यभर करत असतात. राष्ट्रनिर्मितीत शिक्षकांचे योगदान अनमोल असून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव पंकज गुड्डेवार, ज्येष्ठ नेते समशेरखा पठाण, नगरसेवक रमेश चौधरी, नंदू वाईलकर, नगरसेवक श्रीकांत देशमुख, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, नरेंद्र डोंगरे, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, आनंद पारधी, जितू पाटील मुनघाटे, पुष्पराज उंदीरवाडे, मीनल चिमूरकर, नरेंद्र भोयर, हेमंत मोहितकर, अबिद शेख, विनय चव्हाण, हेमंत रामटेके यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.