Home दैनंदिन बातम्या दृष्टीहीन बांधवांना मिळाला पांढऱ्या काठीचा आधार व धान्याच्या किट

दृष्टीहीन बांधवांना मिळाला पांढऱ्या काठीचा आधार व धान्याच्या किट

मैत्री संस्था - युवागर्जनाचा पुढाकार

गडचिरोली : दृष्टीहीनतेमुळे सामान्य जीवन जगण्यास असमर्थ ठरलेल्या बांधवांना आधार देण्यासाठी त्यांना पांढरी काठी आणि धान्याच्या कीट देण्याचा महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. येथील अभिनव लॅानमध्ये जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन मैत्री परिवार संस्था, युवागर्जना फाउंडेशन आणि राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघाच्या वतीने केले होते. (खाली वाचा)

या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून गडचिरोली नगराध्यक्ष अॅड.प्रणोती निंबोरकर, तर समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॅा.मिताली आत्राम होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॅा.अमित साळवे, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष निरंजन पाटील वासेकर, न.प. उपाध्यक्ष निखील चरडे, राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघाचे पदाधिकारी शेंडे, माऊली मित्र मंडळाचे सुहास खरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (खाली वाचा)

‘अनंताच्या पलीकडे जाऊनही अस्तित्व उरावे, तुमच्या डोळ्यातून कुणीतरी जग बघावे’ हा संदेश देत या उपक्रमामुळे दृष्टीहीन नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. यासाठी स्वेच्छेने दान करणाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन युवा गर्जनाचे अनिल तिडके यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश चडगुलवार, प्रकाश मुद्देमवार, संजय बर्वे, दिलीप गडपल्लीवार, अश्विनी भांडेकर, शिल्पा हेमके, सीमा कन्नमवार, सुचिता धकाते, अंजली देशमुख, विकी कोत्तावार व समस्त मैत्री परिवार तथा युवा गर्जना फाउंडेशनच्या सभासदांनी सहकार्य केले.