सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम वेनलाया येथे व्हॉलिबॉल स्पर्धेचे उद्घाटन

ग्रामीण भागात स्पर्धा व्हाव्यात- अम्ब्रिशराव

सिरोंचा : तालुक्यातील अतिदुर्गम वेनलाया येथील राजे व्हॉलिबॉल क्लबतर्फे आयोजित ग्रामीण व्हॉलिबॉल स्पर्धेचे उद्घाटन माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते पार पडला. गावात आगमन होताच गावकऱ्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले.

ग्रामीण भागातील खेळाडू हे शेतात काम करुन उरलेल्या वेळात आपला छंद जोपासतात. ही एक आनंदाची बाब आहे. अलीकडच्या काळात अतिदुर्गम ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात खेळांच्या स्पर्धा होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंची प्रतिभा समोर येत आहे. स्पर्धेमुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ठीकठिकाणी अशा स्पर्धा होणे गरजेचे आहे, असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

याप्रसंगी अध्यक्ष म्हणून युवा नेते कुमार अवधेशराव आत्राम, प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे तालुका अध्यक्ष दिलीप सेनिगारपू, शंकर नरहरी, श्रीकांत शुगरवार, मनोज मंच्चालवार, मल्लन्ना संगर्ती, मधुकर नीलम, स्वप्निल पेद्दी, संतोष पडालवार, संपत दाया, चंद्रशेखर चेम्माकारी, शाहरुख पठाण यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.