अन् काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची चौकात ढोलताशाच्या तालावर धरला ठेका

विजय वडेट्टीवारांच्या नियुक्तीचा साजरा केला आनंद

गडचिरोली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांची काँग्रेस पक्षाच्या वतीने पुन्हा एकदा विधानसभेतील विरोधी पक्षनेते निवड करण्यात आली. या निवडीचा आनंद साजरा करण्यासाठी बुधवार दि.२ रोजी गडचिरोली जिल्हा काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस आणि सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी इंदिरा गांधी चौकात जमून आतिषबाजी केली. तसेच ढोलताशाच्या तालावर ठेका धरून नृत्यही केले.

यावेळी ‘विजयभाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है,’ असा जयघोष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. विशेष म्हणजे याप्रसंगी महिला पदाधिकाऱ्यांनीही ढोल व संदलच्या तालावर ठेका धरत लक्ष वेधले.

यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॅा.नामदेव किरसान, जि.प.चे माजी सदस्य ॲड.राम मेश्राम, शहर अध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार, युकाँचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, प्रदेश सहसचिव कुणाल पेंदोरकर, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष ॲड.कविता मोहरकर, प्रदेश महिला चिटणीस डॅा.चंदा कोडवते, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, तसेच प्रभाकर वासेकर, डॉ.हेमंत अप्पलवार, अनिल कोठारे, रमेश चौधरी, नंदू कायरकर, रजनीकांत मोटघरे, प्रतीक बारसिंगे, राकेश रत्नावार, वसंत राऊत, बाशिद शेख, आरिफ कनोजे, प्रफुल आंबोरकर, सर्वेश पोपट, सुरेश भांडेकर, राजाराम ठाकरे, देवेंद्र ब्राम्हणवाडे ,कमलेश खोब्रागडे, पंकज बारसिंगे, वैशाली ताटपल्लीवार, अर्पणा खेवले, पौर्णिमा भडके, कल्पना नंदेश्वर, प्रेम जिल्हेवार, आशा मेश्राम, संजय चन्ने, लालाजी सातपुते आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.