महाराष्ट्रातही होईल कर्नाटकची पुनरावृत्ती, जोडतोड करणाऱ्यांना जनता नाकारेल

काँग्रेसचे प्रभारी चेन्नीथला यांचा विश्वास

गडचिरोली : महाराष्ट्रात सत्तारूढ असलेले सरकार हे जनतेने निवडलेले सरकार नाही. ईडी-सीबीआयच्या दबावाखाली बनविलेल्या या सरकारला जनताच नाकारेल. महाराष्ट्रातही कर्नाटची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी गडचिरोलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

काँग्रेसच्या नागपूर विभागीय बैठकीसाठी ते गडचिरोलीत आले होते. यावेळी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह विदर्भातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. राज्यात काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कोणतीही गटबाजी आता राहिलेली नसून सर्वजण एकत्र काम करून पक्षाला बळकटी देतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.