देवरी-आमगांव विधानसभा मतदार संघाच्या तीन तालुक्यात महायुतीच्या प्रचाराला वेग

माझ्या कामांमुळे विजय सुकर होईल- खा.नेते

गोंदिया : गडचिरोली-चिमूर मतदार संघातील देवरी-आमगाव विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार आणि खासदार अशोक नेते यांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे. सालेकसा तालुक्यातील पिपरिया, आमगाव तालुक्यातील भोसा आणि देवरी तालुक्यातील चिचगड येथे घेतलेल्या जाहीर सभेत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचाराचा धुरळा उडवत विजयाचा संकल्प केला.

महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांनी आपल्या कार्यकाळातील रेल्वे, रस्ते, पुलासह अनेक विकासात्मक कामांची माहिती या प्रचारसभांमधून दिली. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील निर्णय आणि योजना सामान्य नागरिकांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडविणाऱ्या असल्याचे सांगितले. हे कामच महायुतीच्या विजयाचा मार्ग सुकर करेल, असे सांगत त्यांनी पुन्हा एकदा मोदीजींचे हात बळकट करण्याचे आवाहन केले.

यावेळी माजी आमदार संजय पुराम यांनी आपल्या खास शैलीत मोदी सरकार आणि खासदार म्हणून अशोक नेते यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला.

यावेळी माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, माजी आ.केशव मानकर, माजी आ.भेरसिंग नागपुरे, महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, भाजपचे जिल्हा महामंत्री अनिल येरणे, प्रमोद संगिडवार, पं.स.उपसभापती अंबिका बंजार, दीपक शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॅा.अजय उमाटे, सभापती अनिल बिसेन, आदिवासी नेते शंकरलाल मडावी, मनोज बोपचे, कैलास तिवारी, घनश्याम अग्रवाल, मुन्ना बिसेन, तालुकाध्यक्ष गुमानसिंग उपराडे, परसराम फुंडे, अर्चना मडावी, प्रतिभा परिहार, मधुताई अग्रवाल, आदित्य शर्मा यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.