निसर्गरम्य महादेवगडावर आमदार कृष्णा गजबे यांचा डबा पार्टी संवाद

कुरखेडा : तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या अरततोंडी येथील महादेवगड या निसर्गरम्य देवस्थानाच्या परिसरात रविवारी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकाऱ्यांची डबा पार्टी (टिफिन बैठक) झाली. या बैठकीच्या माध्यमातून आमदार कृष्णा गजबे यांनी कुरखेडा तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांच्यासोबत संवाद साधून सर्वांनी सोबत आणलेल्या जेवणाच्या डब्याचा आस्वाद घेतला.

मोदी @ ९ महाजनसंपर्क अभियानासंदर्भात यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांसोबत संवाद साधण्यात आला. एकमेकांच्या डब्यातील अन्न अनेकांनी वाटून खाल्ले. यामुळे एकमेकांमधील ऋणानुबंध, प्रेम वाढीस लागते, त्यासाठी असे उपक्रम महत्वाचे ठरतात, अशी भावना यावेळी आ.गजबे यांनी व्यक्त केली. खरीप हंगामातील रोवणीची कामे असताना सुद्धा अनेक गावातील नागरिकांनी या टिफिन डबा पार्टीत सहभागी होवून संवाद साधला. सर्वांनी खाली बसून पंगतीत जेवण केले.

यावेळी आमदार कृष्णा गजबे, विशेष अतिथी म्हणून पद्मश्री डॉ.परशुराम खुणे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, भाजप शहराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, तालुका महामंत्री अॅड.उमेश वालदे, नगरसेवक रामभाऊ वैद्य, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत नागीलवार, सभापती अतुल झोडे, नगरसेवक सागर निरंकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोनेष मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य रमेश बावन‌थडे, रोशन सय्यद, भाजयुमो तालुका अध्यक्ष विनोद नागपूरकर, तालुका महामंत्री उल्लास देशमुख, पुष्पराज राहागडाले, किशोर भांडारकर, नितीन झोडे, खुशाल दखने, हेमंत पाटील खुणे, राहूल गिरडकर, बंटी देवढगले, मोहनलाल देशमुख, अमूत ठलाल आणि परिसरातील भाजपा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.