अखेर शिवसेनेच्याही पदाधिकाऱ्यांची लागली जिल्हा नियोजन समितीवर वर्णी

बेलसरे, जम्बेवार, बाला, पठाण यांना संधी

गडचिरोली : जिल्हा नियोजन समितीवर सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यानंतर शिवसेनेच्या (शिंदे) कोणत्याही पदाधिकाऱ्याला संधी दिली नसल्याने मोठा असंतोष पसरला होता. अखेर त्यांचीही डीपीसीवर वर्णी लावण्यात आली.

नव्याने जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती झालेल्या सदस्यांमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, सहसंपर्क प्रमुख हेमंत जम्बेवार, मुलचेरा तालुका प्रमुख गौरव बाला आणि चामोर्शी तालुका प्रमुख पप्पी पठाण यांचा समावेश आहे.

त्यांनी या नियुक्तीचे श्रेय मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव, शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांना दिले.