भाजप महिला आघाडीने बांधल्या ऑटोचालक व डिलिव्हरी बॉयला राख्या

महिला पदाधिकाऱ्यांचे असेही रक्षाबंधन

गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या गडचिरोलीतील महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनात अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. यावेळी त्यांनी जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या नेतृत्वात इंदिरा चौकातील ऑटोरिक्षा स्थानकावरील ६० ऑटोरिक्षा चालक, तसेच डिलिव्हरी बॉय यांना राख्या बांधून रक्षासुत्र बंधन केले. तसेच पेढा भरवून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा सचिव प्रतिभा चौधरी, जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, शहर अध्यक्ष कविता उरकुडे, माजी जि.प.सभापती रंजिता कोडाप, शहर महामंत्री वैष्णवी नैताम, माजी नगरसेविका अल्का पोहनकर, माजी नगरसेविका लता लाटकर, माजी नगरसेविका नीता उंदिरवाडे, शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे, ओबीसी महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष अर्चना निंबोड, माजी शहर अध्यक्ष पल्लवी बारापात्रे तसेच भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.