वडलापेठ येथील हळदीकुंकू कार्यक्रमात महिलांना वाटप केले साड्यांचे वाण

भाग्यश्री आत्राम यांच्या पुढाकाराने आयोजन

अहेरी : माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या पुढाकाराने वडलापेठ येथे संक्रांतीच्या सणानिमित्त हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सर्व महिलांना साड्यांचे वाण वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमाला गावातील सर्व महिलांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला महिलावर्गाने भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी गावातील महिलांनीही भाग्यश्रीताईला सौभाग्याचं लेणं असलेले हळदीकुंकू दिले.

याप्रसंगी माजी जि.प. सदस्य लैजा चालुरकर, माजी सरपंच मंजुळा आत्राम, ताराबाई आत्राम, मोनाबाई तलांडे, भारती सुंके, लैलाबाई सुंके, पुष्पा सुंके, रामबाई मडावी, किरण मडावी, नंदा नैताम, मंजू नैताम, कविता आलाम, कविता आत्राम, सावित्रीबाई मडावी, लक्ष्मी टेकाम आणि गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.