Home दैनंदिन बातम्या लॉयड्सच्या हेडरी रुग्णालयात 400 व्या बाळाचा जन्मोत्सव

लॉयड्सच्या हेडरी रुग्णालयात 400 व्या बाळाचा जन्मोत्सव

वेदनारहित प्रगत प्रसुती तंत्र

400 व्या बाळाला जवळ घेऊन आनंद साजरा करताना लॅायड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन

गडचिरोली : ग्रामीण आरोग्यसेवेत महत्त्वपूर्ण प्रगती साधत हेडरी येथील लॉयड्स काली अम्माल मेमोरियल रुग्णालयाने दोन मोठे टप्पे गाठले आहेत. रुग्णालयात एपिड्युरल अ‍ॅनेस्थेशियाच्या सहाय्याने वेदनारहित सामान्य प्रसुती यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. याशिवाय 400 व्या सुरक्षित बाळाच्या जन्माचाही आनंदही साजरा करण्यात आला आहे. या दोन्ही यशस्वी घटनांमुळे माता आणि नवजात बाळाच्या आरोग्य सेवेत सकारात्मक परिवर्तनाचा नवा टप्पा गाठण्यात यश आले आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

अलीकडील एपिड्युरल सहाय्यित सामान्य प्रसूती ही ग्रामीण भागात सुरक्षित, आरामदायक आणि सन्मानजनक प्रसुती करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची पायरी आहे. ही प्रक्रिया कोणत्याही गुंतागुंतीशिवाय पार पडली. एपिसिओटॉमीची गरज पडली नाही, पेरिनियल टिअर झाले नाहीत आणि प्रसुतीनंतर रक्तस्रावही झाला नाही. तसेच ‘डिलेयड कॉर्ड क्लॅम्पिंग’ आणि वाय-फाय सक्षम सीटीजी मॉनिटरिंगसारख्या आधुनिक पद्धतींचा वापर करण्यात आला. त्यामुळे आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आणि निरोगी आहेत.

जोखमीच्या रुग्णांना केले जाते रेफर

या रुग्णालयाने 400 व्या सुरक्षित प्रसुतीचा टप्पाही गाठला आहे. गर्देवाडा येथील 19 वर्षीय सविता टोप्पो यांना उच्च जोखीम गर्भावस्थेमुळे गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रातून लॅायड्स काली अम्मल रुग्णालयात पाठविले होते. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी तातडीने हस्तक्षेप करत बाळाचा सुरक्षित जन्म घडवून आणला. सध्या माता व बाळ दोघेही सुरक्षित असून त्यांची योग्य काळजी घेतली जात आहे.

ही दोन्ही यशस्वी कामगिरी एलकेएएम रुग्णालयाच्या वाढत्या क्षमतेचे आणि दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना मोफत, गुणवत्तापूर्ण व सुलभ आरोग्यसेवा देण्याच्या बांधिलकीचे द्योतक आहे. स्थापनेपासूनच हे रुग्णालय हजारो कुटुंबांसाठी जीवनदायी ठरत आहे.

रुग्णकेंद्रित आणि मोफत सेवा

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांच्या “सर्वांसाठी सुलभ आणि दर्जेदार आरोग्यसेवा” या दृष्टीकोनातून ही सेवा विकसित झाली आहे. तसेच लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या संचालिका कीर्ती रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णकेंद्रित आणि संवेदनशील सेवांवर विशेष भर दिला जात आहे.

अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि कुशल तज्ज्ञांच्या सहाय्याने एलकेएएम रुग्णालय ग्रामीण भारतातील मातृत्व सेवांना नवी दिशा देत आहे. वेदनारहित प्रसुती आणि 400 सुरक्षित जन्मांचा टप्पा ही समर्पित आरोग्यसेवेची ताकद दर्शवणारी यशोगाथा आहे. दुर्गम भागातही आशा, विश्वास आणि उत्तम आरोग्य परिणाम घडवून आणत आहे.