Home दैनंदिन बातम्या विकास कामांना गती देण्यासाठी सहपालकमंत्री आज गडचिरोलीत

विकास कामांना गती देण्यासाठी सहपालकमंत्री आज गडचिरोलीत

अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक

गडचिरोली : राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल आज (दि.23 एप्रिल) गडचिरोलीच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून आढावा बैठक घेणार आहेत.

दुपारी 12.30 वाजता ते रामटेकवरून गडचिरोली येथील विश्रामगृहात पोहोचतील. दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर आयोजित बैठकीस उपस्थित राहून जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेणार आहेत. या बैठकीत विविध विभागांच्या प्रलंबित कामांना गती देण्यावर भर दिला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सायंकाळी 5.30 वाजता पुन्हा विश्रामगृहात आगमन आणि राखीव वेळ ठेवण्यात आला आहे. रात्री 8 वाजता ना.जयस्वाल गडचिरोली येथून रामटेककडे निघतील.