चामोर्शी : घोट जवळील मच्छली येथे शेषराव महाराज देवस्थान गोंडपिपरी व शेषराव महाराज व्यसनमुक्ती युवक संघटनेच्या वतीने व्यसनमुक्ती सत्संग कार्यक्रम उत्साहात पार पडला. या सत्संग कार्यक्रमांत अनेक युवकांनी व्यसनमुक्त होण्याचा संकल्प केला. यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन केले.
यावेळी प्रणय खुणे म्हणाले, शेषराव महाराज यांनी व्यसनमुक्तीबाबत केलेले कार्य अतुलनीय आहे. युवकांनी त्यांना आदर्श मानून आपल्या जीवनात व्यसनमुक्त कसे व्हावे यासाठी प्रयत्न करावे. निर्व्यसनी होऊन खुशहाल आणि समृद्ध जीवन जगावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शेषराव महाराज देवस्थान गोंडपिपरीचे कार्याध्यक्ष मुन्ना सिडाम, चौधरी महाराज, नाम फाउंडेशनचे विदर्भ समन्वयक उमेश पाटील, मानवाधिकार संघटनेचे भारत खटी, जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी, तसेच राजू सातपुते, संदीप भोवरे, नितेश कोहपरे, नितेश गट्टीवार, हरिदास हुलके, रोशन धोटे, श्यामराव तुंकलवार, आनंदराव वडेंगवार व गावातील पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
































