Home दैनंदिन बातम्या गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त करा- डॉ.उसेंडी

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त करा- डॉ.उसेंडी

महसूलमंत्र्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी

गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित करावेत, अशी मागणी माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (खाली वाचा)

गडचिरोली जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक कमी असल्याने हा जिल्हा आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यातच सिंचन प्रकल्पांचा अभाव, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती, वन्यप्राण्यांमुळे पिकांचे होणारे नुकसान तसेच अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. अनेक भागांत नदी-नाल्यांना पूर आल्याने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (खाली वाचा)

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित करून बाधित शेतकऱ्यांना शासनामार्फत आवश्यक आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी डॉ.नामदेव उसेंडी यांनी केली आहे.