कोंढाळ्यातील इंदिरानगरात होणार आमदार निधीतून सिमेंटचे रस्ते

आ.गजबे यांच्या हस्ते बांधकामाचे भूमिपूजन

देसाईगंज : तालुक्यातील कोंढाळा येथील इंदिरा नगरात सिमेंटचे रस्ते बांधण्याची मागणी अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिकांकडून केली जात होती. ती मागणी पूर्ण करण्यासाठी आ.कृष्णा गजबे यांनी स्थानिक विकास निधीतून मंजुरी दिली. कोंढाळा येथे गावाअंतर्गत सिमेंट रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन आ.गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते पंढरी नखाते, कोंढाळा गावच्या सरपंच अपर्णा राऊत, उपसरपंच गजानन सेलोटे, माजी सरपंच मंगला शेंडे, रोशन ठाकरे, सदस्य शेषराव नागमोती, गोकुल ठाकरे, भागवत मेश्राम, प्रशांत मंडपे, प्रशिक मेश्राम व गावातील नागरिक उपस्थित होते.